shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक..! ११ पेशंटचे आगीत गुदमरून मृत्यू..!अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागाला भीषण आग लागल्याची घटना..!!




सदर घटनेची सखोल चौकशी करा. आ.संग्राम जगताप

११ पेंशटचे गुदमरून मृत्यू तर पंधरा जणांवर उपचार सुरू...!

शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी । राधेश्याम कुसमुडे :
०६ नोव्हेंबर सकाळी साडे दहाच्या सुमारास अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अचानक आग लागल्याने पुढे अतिदक्षता विभागात आग पोहचली. या ठिकाणी साधारण २५ जण उपचार घेत होते, अचानक भीषण आग लागल्याने परिस्थिती तणाव जनक निर्माण झाली.


 जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी आणि रूग्णांच्या नातेवाईकांनी प्रसंगसावधानतेने आग विझविण्यासाठी प्रयत्न करत रूग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवणेसाठी धावपळ केली. काही वेळातच महापालिका अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने त्याठिकाणी दाखल झाल्या, परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली व रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले, तोपर्यंत संपूर्ण आय.सी.यु. जळून खाक झाले.
११ जणांचा गुदमरून मृत्यू तर बाकीवर उपचार सुरू आहेत.सदर घटनास्थळी आमदार संग्राम जगताप हजर होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या तर गंभीर रुग्णांना खाजगी रुग्णालयात हलवण्याची गरज असल्यास तातडीने संबंधित रुग्णांना हलवा अशा सूचना त्यांनी दिल्या. आगीचे कारण शोधले जात आहे.
राज्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधील आगीच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सिव्हिल हॉस्पिटलमधील आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

या घटनेची सखोल माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा जिल्हाधिकारी यांना सदर घटनेची माहिती देण्यात आली आहे. अशा घटना घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घ्यायला हवे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
close