shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंगरुळेच्या माजी विद्यार्थ्यांची २८ वर्षानंतर मस्ती की पाठशाला ; माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात



शालेय जीवनातील आठवणींना उजाळा    
गरीब मित्र- मैत्रिणींना मदतीचा हात
   
प्रतिनिधी : आसावरी वायकर

अक्कलकोट दि .७ /   येथील केएलई संचलित
 मंगरुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२-९३ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा सोलापूर रोड येथील ग्रीन व्हिलेज रिसॉर्ट येथे संपन्न झाला.अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस टी पाटील होते.
    
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन राठोड यांनी केली.गेल्या २८ वर्षानंतर एकत्र येत मित्र मैत्रिणीनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला.सकाळी ११ वाजता स्नेह मेळाव्यास सुरुवात झाली.अक्कलकोट येथे या कार्यक्रमासाठी अनेक ठिकाणचे वर्गमित्र एकत्र आल्याने आनंदीत झाले.२८वर्षानंतर पुन्हा शाळा भरल्याचा अनुभव या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांना अनुभवास आला. या भेटीत अनेक वर्गमित्र अतिशय भारावले होते..

या वेळी ज्योती पाटील,खासीम जमादार,सुरेश राठोड,बसवराज सुतार,सतीश गायकवाड यांनी आपल्या बालपणाच्या कडू गोड आठवणीना उजाळा दिला.जेष्ठ शिक्षक स्वामींनाथ हरवाळकर, सिद्धाराम इचगे, आर.आय.स्वामी, भास्कर सर यांनी विदयार्थ्यांचा तास घेतला. सर्वांनी एकत्रित भोजनाचा आनंद घेतला. शेवटी भावनिक होऊन विद्यार्थ्यांनी निरोप घेतला.

 १९९३ची इ.१० वी ची बॅच एकत्र आणण्यासाठी राजशेखर हिप्परगी, राजू मिरकल,बसवराज म्हेत्रे,विनीत महिंद्रकर,अनिल बिडवे, नीलकंठ कापसे, शिवराज निर्गुडे,रुपाली चनशेट्टी,ज्योती पाटील, गुरुबाई मास्टर यांनी पुढाकार घेतले होते. यावेळी ५२ पैकी ४८ वर्गमित्र व शिक्षक उपस्थित होते.रुपाली चनशेट्टी,ज्योती पाटील आणि गुरुबाई मास्टर यांनी गायलेल्या सुमधुर गाण्यावर बेधुंद होऊन विद्यार्थ्यांसह शिक्षक थिरकले.अडचणीत सापडलेल्या गरीब मित्र-मैत्रिणीना मदत करण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद बोधले यांनी केले तर आभार रुपाली चनशेट्टी यांनी मानले.
 
close