shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ.सुनिता लष्कर यांना कोरोना योद्धा पुरस्काराने करण्यात आले सन्मानित....!



जामखेड । प्रतिनिधी :-  खर्डा ता. जामखेड येथील सौ. सुनिता सतिष लष्कर यांना कोरोना. काळातील केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल ग्रामपंचायत आनाळा ता.परोडा जि.उस्मानाबादच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.जगात कोरोना महामारीने भितीचे सावट असताना जीवाचे रान करुन घरादाराचा विचार ईश्वर भरोसा ठेवून जीवावर उधार होऊन कोरोना रुग्णावर उपचार करून धीर देवून त्यांना जीवनदान देणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातीस परिचारीका सौ. सुनिता लष्कर यांचा सन्मान करुन ग्रामपंचायतीने कोरोना योध्दा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी सौ.सुनिता लष्कर यांचा आनाळा,खर्डा ग्रामस्थांनी व वडार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन-कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत..!
close