शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
नेवासा : तालुक्यातील शेतकरी, सध्या महावितरण कंपनीने चालविलेल्या मनमानी व सक्तीच्या कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. ऐन पेरणीच्या तोंडावर, जाणीवपूर्वक विद्युत प्रवाह खंडित करणे, रोहित्र खराब झाले असेल तर ते बदलून देण्यासाठी विलंब लावणे, पाऊने २ वर्षाच्या काळात, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसूल करणे या सारखा त्रास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक त्वरित थांबवावी
याकरिता, नेवासा तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा येथील एमएससीबीच्या कार्यालयात, दोरीने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदेवाने त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वेळीच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना थांबविल्याने मोठा अनर्थ टळला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

