रक्तदान शिबिरातूनच २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना खरी श्रध्दांजली- मुख्य अधिकारी धैर्यशील जाधव.
इंदापूर प्रतिनिधी:रक्तदान शिबिरातूनच २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना खरी श्रध्दांजली आहे असे प्रतिपादन अकलूज नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी धैर्यशील जाधव यांनी केले.
ते आर्ट ऑफ लिव्हिंग परीवार , अकलूज पोलीस स्टेशन व अकलूज नगरपरिषद यांच्या वतीने शहीददिन व संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते. अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर म्हणाले'भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्य,समानतेबरोबर धर्मनिरपेक्षतेची जोपासना करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.
यावेळी माळशिरस आर्ट ऑफ लिव्हिंगचे सुहास माने,प्रसिद्ध नाडीतज्ञ पांडुरंग देवडकर,ज्ञानाई गुरुकुलचे अध्यक्ष ह.भ.प.सुरेशमहाराज सुळ,माजी पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे,शंकरराव मोहिते-पाटील ब्लड बँकेचे डॉ बाहुबली दोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सत्यपाल ताम्हाणे, बापू ठवरे,गोरख डांगे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हरीभाऊ माने, दिग्विजय देशमुख, अनिकेत सावंत, सत्यवान पराडे, आबा सुर्यवंशी, स्वराज ढवळे यांनी परीश्रम घेतले
या शिबिरात ६१जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.धनंजय देशमुख यांनी तर आभार माऊली मुंडफणे यांनी केले.

