shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा रुग्णालयाचे सुनील पोखर्णांसह सहा जणांवर कारवाई... चार निलंबित... दोन बडतर्फ..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार ०८ नोव्हेंबर २०२१
नगर : जिल्हा रुग्णालयात आगीच्या घटनेचे राज्य सरकारने गांभिर्याने घेतले आहे. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सहा जणांना निलंबित करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर पोस्ट टाकून दिली आहे.
         येथील जिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या अतिदक्षता विभागाला आग लागून अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. येथे लागलेल्या आगीच्या संदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री यांनी मोठा निर्णय घेतला असून जिल्हा  जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह एकूण सहा जणांना निलंबित करण्यात आले आहे. या संबंधातील माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी समाज माध्यमावर दिली आहे. पोखरणा यांचे निलंबन करू नका त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी होत आहे. तसेच त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. 
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

हे झाले निलंबित

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, डॉ.सुरेश ढाकणे-  वैद्यकीय अधिकारी, डॉ. विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी, सपना पठारे-  स्टाफ नर्स, आस्मा शेख -स्टाफ नर्स सेवा समाप्त, चन्ना आनंत - स्टाफ नर्स- सेवा समाप्त
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close