shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणतांब्याला पर्यटन दर्जासाठी प्रयत्न करू - पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१ 
पुणतांबा : परिसराच्या तीर्थक्षेत्र विकासाकरिता निधी देऊन पर्यटन स्थळ घोषित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
ना. ठाकरे रविवारी संगमनेर येथे आले असता पुणतांबा शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी शिवसैनिकांसह त्यांची भेट घेतली. पुणतांबा परिसरातील विविध प्रश्नांबाबत निवेदन देऊन चर्चा केली. पुणतांबा गावाचा तीर्थक्षेत्रात समावेश होऊन पंचवीस वर्षे झालेले आहेत. मात्र या तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळाली नाही. वर्षभरात दोन यात्रा व दैनंदिन भाविकांची मोठी उपस्थिती असते. याठिकाणी काही सुविधा आणि रस्तेही अर्धवट असल्याने भाविकांना अडचणी येतात.

महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या संपूर्ण विकासासाठी निधी द्यावा आणि पर्यटनस्थळ म्हणून घोषित व्हावे यामुळे शिर्डीला येणार्‍या भाविकांना या ठिकाणाचे पर्यटन करता येईल, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close