सुवर्ण विजय ऊत्सव दिन निमित्त आयोजित शौर्यांजली यात्रेच ऐतिहासिक इंदापूर नगरीत दिमाखात स्वागत.
इंदापूर प्रतिनिधी:दि. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी संग्रामसिंग तोमर व त्यांचे सहकारी शौर्यांजली यात्रा घेवून इंदापूर येथे आगमन झाले.
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारत पाकीस्तान युद्धात भारतीय वीर जवानांनी हजारो पाकीस्तानी सैन्याना पराभुत केल होत. भारतीय सैन्याच्या अत्त्युच्च पराक्रमाचा हा क्षण सुवर्णाक्षरात लिहला गेलाय. याच युद्धा मूळे बांगलादेश निर्मितीला सुरूवाता झाली.
या युद्धाला १६ डिसेंबर २०२१ रोजी ५० वर्षे पुर्ण होताहेत. हा सुवर्ण विजय ऊत्सव सोहळा जय हिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व संग्रामसिंग तोमर अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा करीत आहे.
सन १९७१ किंवा त्या अगोदरच्या युद्धात सहभागी झालेल्या भारतीय जवानांचा व शहिद झालेल्या जवानांच्या परिवाराचा सन्मान स्मृती चिन्ह देवून संपुर्ण महाराष्ट्राच्या काना कोपर्यात ही शौर्यांजली यात्रा जात आहे.
आज शिवभक्त परिवार, त्रिदल माजी सैनिक संघटना. युवा क्रांती प्रतिष्ठाण भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे प्रशांत शिताप व समस्त इंदापूरकरांच्या वतीने अनिल गुळुमकर, मनोज मोरे,वाघमोडे सर अस्लम शेख, पियुष बोरा, मेजर मंगेश जाधव ,मेजर मार्कड सर, सौ सुनिता कदम घाडगे,विकास भोसले रोनक बागरेच्या, भगवान कोळेकर महेश मोहिते, यांनी शुभेच्छा व सन्मानपत्र शाल ,हार फेटा श्रीफळ देवून स्वागत केले.
आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते माजी सैनिक बांधव मंगेश जाधव मारकड सर ,कैलाश गवळी यांचा सन्मानपत्र व हार श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.
पाहूण्याच्या हस्ते नगरपालिके समोरील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डाॕ बाबासाहेब आंबेडकर , व शहिद स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

