शिर्डी प्रतिनिधी :
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारने देशात १०० कोटी लसीकरण पुर्ण केल्या निमित्ताने छत्तीसगड येथील भाजपा कार्यकर्ते राजीव राघुवरप्रसाद राजवाडे यांनी छत्तीसगड, मुंबई, स्टॅच्यू ऑफ युनिटी (गुजरात) ते नवी दिल्ली येथे सायकलवर यात्रा करणाचा संकल्प केला आहे.
आज शिर्डी येथे त्यांच्या सायकल यात्रेस यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बजरंग दल राहता तालुका यांच्यावतीने शुभम ताम्हणे, सागर राक्षे, तेजस मुर्तडक, साई गायकवाड, संदिप सोळसे, रितेश भालेराव आदी उपस्थित होते.

