shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शिवसैनिक आणि देशाचा सैनिक यांनी भाऊबीजेच्या दिवशी दिला आधार..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-
 मागच्या पाच सहा दिवसांपूर्वी पैठण येथील अशोक चौधरी या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.त्याच्या आत्महत्येने ऐन दिवाळीच्या प्रकाशमय सनालाच त्याच्या पत्नीच जीवन अंधारमय झालंय,त्याच्या जाण्याने आईवडीलांचा आधार हरवलाय,तर त्याच्या २,४ आणि ७ वर्षांच्या तिन निरागस लहान लहान लेकरांच्या डोक्यावरच बापाचं छत्र कायमचंच दुर गेलय.


त्या संपुर्ण कुटुंबावर अशोकच्या आत्महत्येने जे दुःखाचं सावट पसरलंय ते घरातल्या कर्त्याच असं जाण हे खुप दुःखदायक आहे याची जाणीव करुन देतय.अशा दुःखाच्या वेळी त्यांच्या सोबत गाव त्यांच्या सोबत उभा आहेच पण त्यांना थोडासा का होईना आधार देण्यासाठी युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात आणि देशाचा सीमेवर राहुन सेवा बजावणारा सैनिक गणेश भैय्या लामतुरे या दोघांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ हनुमंत सौदागर ,गावचे सरपंच पुत्र रुस्तुम चौधरी,सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मनोरम पवार यांच्याशी बोलुन त्या आत्महत्याग्रस्त अशोकच्या घरी जात त्या कुटुंबाला धीर दिला.

या दुःखद काळात त्यांना थोडासा आधार देण्यासाठी दिनांक - ६ नोव्हेंबर २०२१ रोजी भाऊबीजेच्या दिवशी किराणा सामान व त्या तिनही लहानग्यांना कपडे देऊन दिला आधार.


अशोकच्या कुटुंबीयांना किराणा व लहानग्यांना कपडे देताना यावेळी उपस्थित पत्रकार सचिन उजगरे, पत्रकार मनोराम पवार, युवासेना उपतालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बोबडे,सुरज चौधरी,नंदकिशोर चौधरी,शषीकांत चौधरी,हनुमंत चौधरी व गावातील युवक उपस्थित होते.
close