शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०२ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला स्व. ना. गोपीनाथ मुंडे हे मावशीचा दर्जा देत होते. गोपीनाथ मुंडे यांची मावशी आता माझी आजी झाली आहे. "पाथर्डी तालुका"या आजीला मी माझ्या बीड लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यासाठी निश्चित प्रयत्न करीन अशी ग्वाही बीड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रितम मुंडे यांनी दिली.
त्या पाथर्डी येथील साईदिप मोबाईल शाँपी व गर्जे सराफ आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, आमदार मोनिकाताई राजळे,अशोकभाउ गर्जे, मुकुंद गर्जे, गोकुळ दौंड, मंगल कोकाटे, विजय गोल्हार,सर्जेराव तांदळे,रामदास बडे,माणिक खेडकर,हे उपस्थित होते.
खा.प्रितम मुंडे पुढे म्हणाल्या की, पाथर्डी ही बीड लोकसभा मतदार संघात आली तर चांगले होईल. ही संकल्पना माझ्या फायद्याची आहे. मुंडे म्हणजे संघर्ष आणि कष्ट हे समिकरण आहे. ईये सोबत झाकी है, दिल्ली अभी बाकी है अशी शेरेबाजी करीत गर्जे कुटुंबाला सल्ला दिला की जेव्हा जेव्हा समाजातील सर्व सामांन्य माणसावर, समाजातल्या शोषितावर अंन्याय होईल तेव्हा शोषितांच्या बाजूने अंन्यायाच्या विरोधात गरजन्याची जिम्मेदारी घ्या जनता तुमच्या सोबत राहील असे आवाहन मुंडे यांनी केले
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

