शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
राहुरी : तालुक्यातील वाघाचा आखाडा परिसरातील प्रगतीशील शेतकरी ऍडव्होकेट वसंत येवले यांना घरात पलंगाखाली सहा ते सात फूट लांबीचा भला मोठा साप दिसून आला तेव्हा येवले यांनी तात्काळ राहुरी येथील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना फोन वरून माहिती दिली असता पोपळघट यांनी जाऊन बघितले असता तिथे धामण जातीचा मोठा साप आढळून आला. कृष्णा पोपळघट यांनी काही क्षणात सापाला पकडून ताब्यात घेतले व येवले कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला.
परिसरात कोठेही साप आढळून आल्यास त्याला न मारता आमच्याशी संपर्क करा असे आव्हान कृष्णा पोपळघट यांनी यावेळी केले.
यावेळी घटनास्थळी गोविंद दहिवाळकर, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ तनपुरे व मोठया प्रमाणात नागरिक जमा झाले होते. सर्वांनी कृष्णा पोपळघट यांच्या धाडसाचे कौतुक करत आभार मानले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

