शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०७ नोव्हेंबर , २०२१
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुका आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे, अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वाघुंडे येथे सुमारे 60 लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या ग्रामसचिवालयाचे लोकार्पण तसेच विविध उदघाटन कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. या वेळी आमदार नीलेश लंके, अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाअध्यक्ष बाबाजी तरटे, सरपंच रेश्मा पवार, माजी सरपंच संदीप मगर, उपसरपंच मंगल मगर, पुनम मुंगशे,संध्या औटी, कारभारी पोटघन, सचिन पठारे, राजू शिंदे, राजू शेख, मनिषा मगर, बाबासाहेब मगर, राजू मगर, सचिन पवार, भाऊसाहेब भोगाडे आदी उपस्थित होते.हसन मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात सर्व तरूण आमदार दिले आहेत. त्यात पारनेर-नगरसाठी नीलेश लंके सारखे उमलते नेतृत्व आता तालुक्या पुरते मर्यादित राहिले नसून ते आता राज्याचे उमलते नेतृत्व झाले आहे. पक्षाची ताकद विकास कामाच्या माध्यमातून वाढवायची आहे.
मुश्रीफ पुढे म्हणाले, या फक्त एक हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या गावाने विविध विकास कामे करूण इतर गावांपुढे आदर्श व निर्माण केला आहे. मी या पुढेही या गावाला अधिकचा निधी देणार आहे. राजकारणात इर्षा असावी मात्र मतभेद नसावेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

