इंदापूर तालुक्यातील पुल व रस्त्यांकरिता २१ कोटींचा निधी मंजूर:- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील निर- निमगाव गावातील नीरा नदीवरील पुला करिता १३ कोटी ७५ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. याच बरोबर बावडा पिठेवाडी भगतवाडी कचरवाडी ते पुणे जिल्हा हद्द मार्ग या १३ किलोमीटर लांबीचा रस्त्या करिता ७ कोटी २० लाख रुपये नाबार्ड टप्पा क्र २७ अंतर्गत झाली असल्याची माहिती देण्यात आली. यात प्रामुख्याने दोन जिल्ह्यांना तसेच तालुक्यांना जोडणारा व दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत जवळचा व सोयीस्कर मार्ग म्हणून या रस्त्यावर पुलाचे महत्त्व आहे यामुळे इंदापूर बावडा निरनिमगाव नदीवरील पूल ते माळशिरस म्हसवड हा मार्ग जोडला जाणार आहे. यामुळे सुमारे २० किलोमीटर अंतर कमी होणार असून नव्याने प्रस्तावित फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग होत असलेल्या माळशिरस तालुक्यातील घाणीचुना येथे रेल्वे स्टेशन होणार आहे हे नवीन रेल्वे स्टेशन निरनिमगाव नदीवर पूल झाल्यास फक्त दोन किलोमीटर अंतर असणार आहे. त्यामुळे सदर चा मार्ग व पूल पूर्ण झाल्यास इंदापूर म्हसवड सांगली कोल्हापूर कडे जाण्याचा मार्ग सर्वात जवळचा असणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ऊस वाहतूक अंतर कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणार आहे .त्याच प्रमाणे इंदापूर तालुक्यातील भिगवण रेल्वे स्टेशन प्रमाणे माळशिरस तालुक्यातील रेल्वे स्टेशन इंदापूर तालुक्याच्या अत्यंत जवळचे म्हणून रेल्वे स्टेशन होणार आहे. यामुळे एम आय डि सी मधील किंवा साखर कारखान्यातील मालाची वाहतूक जवळची होण्यास मदत होणार आहे अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

