shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रत्येक घरासमोर देशी गौमातेला पाळले तर जीवनात येणारी संकटे नायनाट होतात- रामायणाचार्य हभप मनोहर महाराज सिनारे


सर्वांनी गट तट बाजूला सारून एकत्र आले तरच काल्याचे किर्तनाचे भाग्य लाभते..!

देहरे । प्रतिनिधी :- 
नगर तालुक्यातील देहरे गावात उड्डाणपूल जवळ परमहंस सद्गुरू आनंदमाई मठात परमहंस सद्गुरू आनंदमाई समाधी ५१ व्या वर्षानिमित्त त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन केले होते. यावेळी रामायणाचार्य हभप मनोहर महाराज सिनारे यांच्या सुमधुर वाणीतून काल्याचे किर्तन संपन्न झाले.

नगर -शिर्डी-मनमाड रस्त्यावर देहरे गाव आहे. या ठिकाणी उड्डाणपूल जवळ परमहंस सद्गुरू आनंदमाई आनंदमाई मठ व दत्तात्रय मंदिर आहे. या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे परमहंस सद्गुरू आनंदमाईचे सप्ताह आयोजन करण्यात आले. यावर्षी ५१वे सप्ताह निमित्त काल्याचे किर्तनात रामायणाचाचार्य हभप मनोहर महाराज यांनी श्रीकृष्ण भगवान यांच्या अनेक लिलांचे अनेक प्रमाण देऊन आपल्या सुमधुर वाणीतून गाणी गात किर्तनातून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 

जगाचा नायक कन्हैयाने (धेनू)गौमातेला जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान देऊन गौमातेचे संरक्षण व विस्तार केला.   आपल्याही जीवनात पुढच्या पिढीचे जर उध्दार व्हावे असे वाटत असेल तर देशी गौमातेचे संरक्षण व विस्तार केला तर तुमच्या पिढीचे उध्दार करा. यासाठी देशी गौमाता आपल्या दारासमोर जरूर पाळून आपल्या जीवनाबरोबर पुढच्या पिढीचे उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही ...! असे यावेळी महाराज म्हणाले.

या कार्यक्रमासाठी पं.स.सदस्य व्हि.डी.काळे, आदर्शगाव मांजरसुंभाचे जालिंदर कदम, हभप भाऊसाहेब बंगे,पौळ महाराज, महेश महाराज, लक्ष्मण महाराज, श्रीहरी महाराज काळे, दत्तात्रय काळे महाराज,हभप सखाराम महाराज जेठे,  बी.जी.लांडगे सर, ढोकणे महाराज,मेजर काळे,रोहोकले दादा,प्रकाश धनवटे सर,हरिकिशन धनवटे,अन्नदाते दत्तात्रय कुसळकर, दिलिप धनवटे, सदस्य मेघनाथ धनवटे,किसन धनवटे,सागर धनवटे, गणेश‌ जेठे आदी उपस्थित होते.यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close