शिर्डी । प्रतिनिधी :
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी व तटपुंजे वेतन देवून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यां सोबत अन्याय होत आहे दिलेल्या पगारातून मूलभूत गरजा सुद्धा भागविणे कठीण झाल्याने कर्मचारी कर्जबाजारी झाला आहे.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जवळपास तीस राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नैराश्यातुन आत्महत्या सारखे गंभीर पाऊल उचलले आहेत. आणि तो आकडा आणखीन वाढतच आहे.
तसेच राज्यातील अनेक आगारातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत. सदर ठिकाणी आपल्या आगारातील बस गेल्यावर संपकरी कामगारांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते व काही प्रसंगी शिवीगाळ देखील केली जाते त्यामुळे कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्याची मानसिकता बिघडते त्यामुळे काहीतरी विघटित आघात होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी हा गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहे, त्यामुळे सामान्य जनतेचे अतोनात हाल व नुकसान होत आहे, राज्य परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र राज्याची लाईफ लाईन आहे, ST मुळे अनेक प्रसंगी चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध करून दिली गेली आहे त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला दैनंदिन व्यवहारात होत आहे, राज्य सरकारने महामंडळ हे शासनात विलीन केल्यास अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल. महाराष्ट्र राज्य शासनाने तसे न केल्यास राज्य परिवहन महामंडळाचे अतोनात नुकसान होणार आहे. त्याची नुकसानभरपाई ही कधी न भरून येणारी आहे. त्यामुळे ST कर्मचारी यांनी आपली मागणी योग्य प्रकारे मागणी करीत असून त्यास इंटरनॅशनल ह्यूमन राईटस असोसिएट्स या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण जाहीर पाठिंबा आहे. तरी सबब विनंती की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे.
ST कर्मचारी वर्ग यांचा पगार वाढविण्यात यावा व राज्य शासनाच्या इतर सेवा सुविधा ST कर्मचारी यांना देण्यात याव्यात हे जाहीर निवेदन देण्यात आले असे ॲड.डॉ विक्रांत वाघचौरे म्हणाले.

