shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा नवीन वाणांना मान्यता..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ३१ डिसेंबर २०२१ 

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दहा नवीन वाणांना मान्यता..!!

राहुरी विद्यापीठ :   महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषी विद्यापीठे (agriculture university) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी येथे कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत (Meeting) संपन्न झाली.

          या बैठकीस अध्यक्षस्थानी कृषिमंत्री ना. दादा भुसे, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ. व्ही.एम. भाले, डॉ. अशोक ढवण, डॉ. संजय सावंत आणि परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने ऑनलाईन उपस्थित होते.

 

या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे दहा वाण, एक कृषियंत्रे अवजारे आणि ५८ पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानामध्ये प्रथमच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तीन शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विविध पिकातील प्रसारित केलेल्या वाणामध्ये ज्वारी-फुले यशोमती, गहू-(फुले अनुपम) एन.आय.ए.डब्ल्यू ३६२४, सोयाबीन-फुले दुर्वा, उडीद-फुले वसू, तीळ-फुले पुर्णा, ऊस-फुले ११०८२, करडई-एस.एस.एफ १५-६५, एस.एस.एफ १६-०२, पेरु-फुले अमृत, चिंच-फुले श्रावणी हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले ऑटोमॅटीक पलटी नांगर यंत्र व ५८ तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रसारण केंद्राने दिली.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close