shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जैन संघटना आयोजित गर्ल वर्कशॉप युवतींचा गौरव सोहळा संपन्न ; यश कल्याणी सेवाभावी संस्थेने केला सर्वांचा सन्मान


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

  करमाळा: दि. २८/ करमाळा तालुका शहरात भारतीय जैन संघटना आयोजित  स्मार्ट गर्ल वर्कशॉप मध्ये सहभाग घेतलेल्या सर्व युवतींचा गौरव सोहळा यश कल्याणी सेवाभावी संस्था येथे आयोजित केला गेला होता. येथे 35 मुलींचा सहभाग होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामसुधार समितीचे  अध्यक्ष व एडवोकेट हिरडे सर,  प्रमुख पाहुणे तसेच प्राध्यापक मोहिते मॅडम, मोहिते सर,  गणेश शिखरे पाटील, भारतीय जैन संघटना ग्रामीण सचिव प्रदीप जी बल्डोटा, निलेश जी कटारिया, तसेच अकॅडमीच्या संचालिका व भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष संज्योती मुथा मॅडम (स्मार्ट गर्ल ट्रेनर), या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

  या कार्यक्रमांमध्ये पालकांचाही समावेश होता हिरडे साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्मार्ट गर्ल ही योजना येणाऱ्या नव्या पिढीसाठी अत्यंत गरजेची आहे व त्याचे नियोजन प्रत्येक ठिकाणी केले गेले पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेशजी करे पाटील यांनी केले.

   त्यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की शांतीलाल जी मुथा यांना नक्कीच नोबेल पारितोषिक मिळणार या पद्धतीची त्यांचे भारतीय जैन संघटनेचे कामाची चळवळ चालू आहे. सौ ज्योती मुथा मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आलेल्या सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व सहभागी स्मार्ट यांची मनोगते त्यांनी व्यक्त केली या मुली मध्ये मनोगतामध्ये श्रुती कटारिया,  समीक्षा कटारिया, उन्नती सोळंकी, यांनी आपले मनोगत व्यक्त केली व त्यांनी सांगितले की स्मार्ट या उपक्रमांमध्ये आम्हाला अत्यंत काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या कार्यक्रमांमध्ये प्राध्यापिका मोहिते मॅडम यांचाही सन्मान यश कल्याणी सेवाभावी संस्थेकडून त्यांना मानपत्र देऊन करण्यात आला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ज्योती मुथा मॅडम यांचाही मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ . प्रीती कटारिया यांनी केले.
close