shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २५ डिसेंबर २०२१ 


अल्पवयीन मुलीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल..!!


संगमनेर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना तालुक्यातील गुंजाळवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातील ही मुलगी असून आई-वडिलांचे भांडण झाल्याने ती आपल्या आईसोबत गुंजाळवाडी येथील बाबासाहेब गुंजाळ यांच्या घरी राहत होती.

बाबासाहेब याने दि. ५ ऑक्टोबर रोजी सदर मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत तिने आपल्या आईला सांगितले असता तिच्या आईने शांत राहण्यास सांगितले.
यानंतर सदर युवती आपल्या वडिलांकडे आली. काल तिने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर मुलीची आई व बाबासाहेब बाबुराव गुंजाळ ( रा. गुंजाळवाडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निकिता महाले हे करीत आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close