शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा ,प्रमोद चौधरी एरंडोल, जिल्हा जळगाव दिनांक ०१ डिसेंबर २०२१
एरंडोल.:-महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागामार्फत विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आमदार चिमणरावजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून एरंडोल शहरासाठी अडीच कोटी रुपये एवढा भरघोस निधी मंजूर करण्यात आला. याकामी महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे सहकार्य मिळाले...
एरंडोल शहरासाठी नुकताच रु. ४ कोटी एवढा निधी मंजूर केल्यानंतर पुन्हा शहराच्या मूलभूत गरजा व मुख्य समस्या विचारात घेऊन आमदार चिमणराव जी पाटील यांनी शहरातील विविध भागासाठी अडीच कोटी रुपये एवढा निधी मंजूर केला.या विषयी बोलताना आमदार चिमणरावजी पाटील म्हणाले की यापुढे देखील एरंडोल शहरासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यात येईल, विकासाची गंगा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो, एरंडोल शहराच्या इतिहासात वर्षभरात सुमारे दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करणारा एकमेव आमदार असल्याचे आपल्याला समाधान वाटते, लोकशाहीत जनता हीच केंद्रबिंदू समजून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले, एरंडोल शहरातील नागरिकांनी भविष्यात नगरपालिकेवर शिवसेनेला एक हाती सत्ता दिल्यास सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर करू असा मानस आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
* शहरात मंजूर विकास कामे*
1) नगर पलिका हद्दीतील महात्मा फुले पुतळ्याजवळ मारुती माळी व बोरसे गल्ली परिसर रस्ता कॉंक्रिटीकरण 60 लाख रुपये
२) एरंडोल नगरपालिका हद्दीतील गटनंबर 986 जागेवर सामाजिक सभागृह परिसर कॉंक्रिटीकरण सादरीकरण व गटार २० लाख रुपये
३) शांतीनगर भागातील रस्ता कॉंक्रिटीकरण व गटार बनवणे ४० लाख रुपये
४) तबेला परिसर रस्ता कॉंक्रिटीकरण गटार बांधकाम २५ लाख रुपये
५) सिटी सर्वे नंबर सोळाशे १६७०+१६७१ नगरपालिका मालकीच्या जागेवर जय गुरु व्यायाम शाळा परिसर लादी करण करणे २५ लाख रूपये
६) गुलाब पाटिया यांच्या वखार पासून घनश्याम खैरनार यांच्या घरापर्यंत गटारी सह रस्ता कॉंक्रिटीकरण ३० लाख रुपये
७)नगरपालिका सिटी सर्वे नंबर 891, 892 भोई समाज पंच मंडळ समाज मंदिर बांधणे २० रुपये
८) नगरपालिका हद्दीतील गट क्रमांक 253 मुस्लिम कब्रस्तान शेड बांधकाम २० लाख रुपये
९) पुरे भागातील मारुती मंदिर परिसरात संरक्षण भिंत लादी करण पंधरा १५ लाख रुपये
१०) प्रभाग क्रमांक ८ मध्ये शादीखाना बांधकाम करणे २० लाख रुपये असे एकूण दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा भरीव निधी असलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होईल असेही ते यावेळी म्हणाले.

