राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ भोसलेवस्ती,केंद्र -निमगाव केतकी येथील शिक्षक समाधान भोंग यांना पुरस्कार प्रदान.
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेवस्ती,केंद्र -निमगाव केतकी या ठिकाणी कार्यरत असणारे उपक्रमशील,तंत्रस्नेही शिक्षक समाधान अशोक भोंग यांचे शाळेतील उपक्रम,सामाजिककार्य,गुणवत्तापूर्ण शिक्षण,वाढलेला पट व संस्कारक्षम शिक्षण लक्षात घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षकरत्न पुरस्कार २०२१ हा टिळक स्मारक मंदिर पुणे या ठिकाणी रमेश आव्हाड(माजी पोलीस अधीक्षक),श्यामसुंदर सोन्नर,(सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक ,कवी) यांच्या हस्ते व बबनराव रसाळ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर शुभदा जोशी इंटरनॅशनल सोशल आयकॉन, प्रकाश सावंत महापरिषद समन्वयक, मनीषा गवळी समाजसेविका इत्यादींच्या उपस्थितीमध्ये (दि.२४ डिसेंबर) रोजी प्रदान करण्यात आला.यावेळी समाधान भोंग सरांचे आई,वडील व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

