प्रतिनिधी :आसावरी वायकर
देहरे : २६ / नगर तालुक्यातील देहरे येथील पंढरीनाथ धोंडिबा पाखरे यांचे दि .२३ डिसेंबर २०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . ते ७५ वर्षांचे होते . देहरे येथील अमरधाम येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
न्यू लॉ कॉलेज नगर येथील नारायण पाखरे यांचे ते वडिल आहेत .ते अत्यंत धार्मिक तसेच मनमिळावु स्वभावाचे होते . त्यांचे मागे पत्नी ,दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे .
दशक्रिया विधी शनिवार दि. १/१/२०२२ रोजी सकाळी ८:०० वा. अडा डोह, हायस्कूल शाळेकडे, देहरे येथे होणार असून या ठिकाणी ह. भ. प. गणेश महाराज नवले (वांबोरी) यांचे प्रवचन होणार असल्याचे नारायण पाखरे यांनी सांगितले .

