शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक ०५ डिसेंबर २०२१
"प्रसाद" चा "तनपुरे" ला गाळपासाठी मदतीचा हात ; 'डॉ तनपुरे' ला दैनंदिन १ हजार ५०० में टन उसाचा पुरवठा : कार्यक्षेत्रातील सर्वच शेतकऱ्यांच्या ऊसांचे गाळप होणारं..!!
राहुरी : ऊस क्षेत्राचे आगार असलेल्या राहुरी तालुक्यामध्ये सहकार क्षेत्राची कामधेनू तनपुरे कारखान्यासह वांबोरी येथील प्रसाद शुगरने गाळपात आघाडी घेतल्याचे समाधानात्मक चित्र आहे. दरम्यान, आर्थिक संकटात असलेल्या तनपुरे कारखान्याला प्रसाद शुगर कारखान्याने मदतीचा हात देत दैनंदिन ऊस पुरवठा सुरू केला आहे. दोन्ही कारखाने उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे.
@ प्रसाद शुगर कारखान्यांकडून १ लाख मे. टन ऊसाचे गाळप..!!
"राहुरी तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील १३ कारखान्यांच्या टोळ्या कार्यरत असतांनाही प्रसाद शुगर कारखान्याने १ लाख मे.टन ऊस गाळपाचा टप्पा गाठलेला आहे. प्रसाद शुगर चा वजन काटा हा अतिशय काटेकोर आहे.
प्रसाद शुगर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस तोडणी करिता कोणतीही घाई करू नये सर्वांचा ऊस तुटणार आहे म्हणून शेतकर्यांनी निश्चिंत राहावे.
- सुशीलकुमार देशमुख,(कार्यकारी संचालक प्रसाद -शुगर वांबोरी)"
अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ऊसाचे उत्पादन घेणार्या राहुरी परिसरात १३ ते १४ कारखान्याच्या टोळ्या दाखल होऊन ऊस तोडणी करीत आहेत. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या पाठबळामुळे तालुक्यातील तनपुरे कारखाना व प्रसाद शुगरचे बॉयलर पेटलेले आहे. दोन्ही कारखान्यांच्या धुराड्यातून धूर बाहेर पडत असताना साखरेची निर्मिती होऊ लागली आहे. राहुरीच्या साखरपट्यामध्ये सर्वाधिक सरासरी देणारा ऊस उपलब्ध होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ऊसावर डोळा ठेवत आपली यंत्रणा उभारली आहे. तनपुरे कारखाना आर्थिक संकटाने वेढलेला आहे. कारखाना व्यवस्थापणाने कसेबसे आर्थिक पाठबळ उपलब्ध करून कारखान्याचे धुराडे पेटविले. परंतु आर्थिक अडचणींमुळे ऊस तोडणी करणार्या टोळ्यांची अधिक प्रमाणात उपलब्धता होऊ शकली नाही.
तर दुसरीकडे वांबोरी येथील प्रसाद शुगर वांबोरी या कारखान्याकडे सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्राची नोंदणी असल्याने सर्वत्र ऊस तोडणी जोमात सुरू आहे. प्रसाद शुगर कारखान्या मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होत असल्याचे पाहून राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाने प्रसाद शुगर कारखान्याने दैनंदिन १ हजार ते १ हजार ५०० मे.टन या प्रमाणे तनपुरे कारखान्याला ऊस पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे प्रसाद शुगरसह तनपुरे कारखान्यानेही गाळपात आघाडी घेतल्याचे समाधान देणारे चित्र आहे.
तनपुरे कारखान्यावर निर्माण झालेले आर्थिक अरिष्ट पाहता खासदार डॉ. सुजय विखे, अध्यक्ष नामेदवराव ढोकणे, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, शामराव निमसे यांसह सर्वच संचालक मंडळाने कारखाना सुरू करून सभासद व कामगारांना न्याय देण्याचा निर्णय घेतला. तनपुरे कारखान्याच्या व्यवस्थापणाला राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांनी पाठबळ दिले असताना प्रसाद शुगर कारखान्याकडून मोलाची मदत होत असल्याचे दिसत आहे. प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख, ज्येष्ट संचालक सुरेश बाफना, चिफ जनरल मॅनेजर विकास आभाळे यांच्या नियोजनातून कारखाना व्यवस्थीतरित्या सूरू असुन प्रसाद शुगर कारखान्याने तोडणी केलेला अतिरीक्त ऊस तनपुरे कारखान्याच्या दारात उभा होत आहे. त्यामुळे तनपुरे कारखान्याकडून दैनंदिन ३ हजार १०० मे.टन ऊस गाळप केला जात आहे. तनपुरे कारखान्यामध्ये साखर उत्पादनाला गती मिळाली असून ३७ हजार मे.टन ऊस गाळप पूर्ण झालेले आहे. ४ लाख मे. टन ऊस गाळप करून तनपुरे कारखाना आपले उद्दीष्ट्य गाठण्यासाठी सज्ज दिसत आहे. तनपुरे कारखान्याने उद्दीष्ट्यपूर्ती केल्यास आर्थिक पाठबळ लाभणार आहे. तनपुरे कारखान्यावर निर्मित झालेले आर्थिक संकट दूर करण्यासाठी गाळपात उद्दीष्ट्य गाठणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी प्रसाद शुगर कारखान्याने मोलाची मदत केल्याने सभासद आणि शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे प्रसाद शुगर कारखान्यानेही गाळपामध्ये आघाडी घेत सुमारे एक लाख मे.टना पेक्षा अधिक ऊसाचे गाळप केले आहे. प्रसाद शुगर कारखान्याकडून ऊस तोडणीसाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. या गळीत हंगामात आठ लाख मेट्रिक टनाचे उद्दीष ठरवलेले असल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये आणि बाहेरील क्षेत्रातही ऊस तोडणी सुरू केलेली आहे. राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. शेतकर्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये. सर्वच शेतकर्याचे ऊस तोडणी केली जाणार आहे. प्रसाद शुगर कारखान्याकडून प्रोग्राम नुसारच ऊस तोडणी होत आहे. त्यामुळे शेतकर्यांनी कोणतीही तमा न बाळगता निश्चिंत रहावे. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी प्रसाद शुगर व्यवस्थापण कटिबद्ध असल्याचे कार्यकारी संचालक देशमुख साहेब यांनी या वेळी सांगितले आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

