shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा अधिकारी कार्यालय अहमदनगर नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळा संपन्न..!

अहमदनगर । प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अशा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय देखील सुसज्ज असावे असे अनेकांची इच्छा होती. पुर्वी जुन्या पद्धतीच्या इमारतीत कार्यालयाचे कामकाज चालत असे.. त्यानंतर आता जिल्हाधिकारी ज्या ठिकाणी बसत होते. ती इमारत बांधण्यात आली. परंतु जिल्ह्याला शोभेल अशी सुसज्ज इमारत व्हावी ही सर्वांची इच्छा होती.ती आज पुर्ण झाली.

आज दिनांक 29 डिसेंबर 2021रोजी सकाळी ठीक अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व जिल्ह्याचे  पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close