श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - श्रीरामपूर शहरात सामाजिक, सांस्कृतिक, कला,क्रीडा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या स्व.बुधमलजी कुंकूलोळ ट्रस्टच्यावतीने समाजातील अंध,अपंग,दुर्लक्षित, अनाथ मुलांना नाताळ सणानिमित्त समाजातील मुलांनी, नागरिकांनी सांताक्लॉज बनून स्वतः भेटवस्तू आणाव्यात भेटवस्तूवर नाव व वस्तूचा उल्लेख करून उपेक्षितांचे नाताळ साजरा करावयाचा आहे, तेव्हा मुलांनी सांताक्लॉज बनून त्यांचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन स्पाकलिंग इव्हेंट व कुंकूलोळ परिवाराच्यावतीने करण्यात येत आहे.
सदरचा नाताळ सोहळा २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत म्हाडा कॉलनी बेलापूर रोड श्रीरामपूर येथे होणार आहे.
या उपक्रमासाठी जिल्हाभरातून दिव्यांग,अंध,अपंग,निराधार,जवळपास १४० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.या मुलांसाठी समाजातील मुला- मुलींनी सैनिक,वारकरी, सांताक्लॉज,संत,यासारख्या वेशभूषा करून उपेक्षित मुलांना आपल्याजवळील भेट वस्तू देऊन त्यांच्या समवेत आनंद साजरा करून त्यांचे मनोरंजन करावयाचे आहे,सर्व सृष्टीतील मानव जातीला सुख समाधानाने जीवन जगता यावे त्यांच्यातील एकटेपणाची भावना दूर करण्यासाठी अशा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोविड महामारी नंतर नागरिक भयमुक्त होण्यासाठी हा करमणुकीचा कार्यक्रम तर आहेच परंतु याला सेवेचा पावित्रही आहे, ज्या मुलांना आपल्या अंगी असणारी विविध कला सादर करावयाची आहे त्यांनी सतीश टायर,अथवा सौ.श्वेता कुंकूलोळ यांच्याशी संपर्क साधावा. प्रेम, आनंदाची भुकेली असलेल्या अनाथांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुलांनी सांताक्लॉज बनवून यावे व या मुलांना भेटवस्तू द्यावे आणि तथा शांती व प्रेमाचा संदेश देणारा नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन स्पाकलींग इव्हेंट व कुंकूलोळ परिवारातील सर्व सदस्यांनी केले आहे,
श्रीरामपूर शहरात साजरा होणारा हा आगळा - वेगळा सोहळा सर्वांनी अनुभवावा असे संयोजकांनी आवर्जून सांगितले आहे.

