shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सर्वसामान्य जनता टोल भरते, मग आमदार, खासदार का नाही❓ गडकरी बोलले स्पष्टच..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१ 

नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महाराष्ट्रात तर पेट्रोल तब्बल 110 रुपयांपर्यंत पोहचले आहे. डिझेलच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाली असून डिझेलचे दरही 100 च्या घरात पोहचले आहे. अशातच कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्यानं जागतिक स्तरावर खनिज तेलाचे दर कमी झाले आहेत. मात्र तरीही देशवासीयांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
दरम्यान इंधनाच्या दरात होणारी सातत्याने वाढ, टोल यामुळे वाहतूक खर्च देखील वाढला आहे. अशातच सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त असताना आमदार, खासदार मात्र टोल न भरताच त्यांची वाहनं दामटवतात. त्यामुळे सर्वसामान्य माणूस टोल भरत असताना लोकप्रतिनिधी टोल का देत नाहीत ?असा सवाल एका कार्यक्रमात नितीन गडकरींना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी देखील या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिलं

     लष्कर, रुग्णवाहिका, ट्रॅक्टरनं शेतमाल नेणारे शेतकरी, खासदार आणि आमदारांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. मात्र सगळ्यांना सवलत देणं शक्य नाही, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. चांगले रस्ते हवे असतील तर पैसे द्यावे लागतील, असंही गडकरींनी म्हटलं. ते आज वृत्त वाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

सुविधा हवी तर पैसे द्यावे लागतील’

आधी लोक वाहतूक कोडींत अडकायचे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर अधिक पैसा खर्च व्हायचा. आता रस्ते चांगले असल्यानं पैसा वाचतो. मग त्या बदल्यात टोल भरण्यात काय अडचण आहे, असा सवाल गडकरींनी उपस्थित केला. त्याचबरोबर ‘रस्ते बनविण्यासाठी सरकारने पैसे उधार घेतले आहेत. ज्याची परतफेडही करावी लागत आहे आणि त्याचे व्याज भरावे लागणार आहे. त्यामुळेच टोल आकारावा लागतोय. असं गडकरींनी म्हटलं आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close