shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर ब्रेकींग : श्रीरामपुरात ओमिक्रॅानची एन्ट्री ,महिलेला झाली लागण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ 

अहमदनगर ब्रेकींग : श्रीरामपुरात ओमिक्रॅानची एन्ट्री ,महिलेला झाली लागण..!!
सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. परंतु आता सर्वत्र ओमिक्रोन व्हेरिएंटने चिंता निर्माण केली आहे...

आता अहमदनगरसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. नाजेरिया येथून श्रीरामपूर शहरात आलेली 41 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली आहे.
श्रीरामपूर : शहरातील एका व्यावसायिकाची नातेवाईक असलेली ४१ वर्षीय महिला व तिचा सहा वर्षीय मुलगा दि. १५ डिसेंबर रोजी नायजेरियातून श्रीरामपुरात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील सहा जणांचे नमुने तपासासाठी घेतले होते. या सर्वांचे अहवाल त्यावेळी निगेटिव्ह आले होते. त्यावेळी या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

 
     या मायलेकांना शहरातील एका खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या दरम्यान, सदर मायलेकांचे नमुने ओमायक्रॉनच्या तपासणीसाठी पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना प्राप्त झाला. त्यातील महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 
        अद्याप मुलाचा अहवाल आलेला नसून ओमायक्रॉनच्या रुग्णाचे अहवाल जोपर्यंत निगेटिव्ह येत नाही. तोपर्यंत त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड यांनी दिली.
        कोरोना व्हायरसच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे भारतात आतापर्यंत ३४६ रुग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रात ८८, दिल्लीत ५७ रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत हा व्हायरस प्रचंड वेगाने संक्रमित करत असल्याचं सांगण्यात आले आहे.
सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close