shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढीव दराने वीजबिल अदा करणे पाणीपुरवठा संस्थाना अशक्य - अध्यक्ष केशव सुर्वे व उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे.श्री.भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था सुरवड ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न

वाढीव दराने वीजबिल अदा करणे पाणीपुरवठा संस्थाना अशक्य - अध्यक्ष केशव सुर्वे व उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे.

श्री.भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था सुरवड ची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण संपन्न

पाणीपुरवठा संस्थेच्या अडचणी संदर्भात शासनाने घालावे लक्ष -  पाणीपुरवठा सभासद शेतकऱ्यांची मागणी.

सुमारे ३२५%  वाढ झाल्याने शेतकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या पाणीपुरवठा संस्था अडचणीत येण्याची शक्यता - दत्तात्रय घोगरे.


वाया जाणाऱ्या पाण्यामध्ये बचत व्हावी म्हणून शेतीला बंद पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करणारी राज्यातील एकमेव सुरवड येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्था एक आदर्श मॉडेल.

फोटो : सुरवड येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेच्या कामकाजाची माहिती देताना उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे.
 
 
   इंदापूर प्रतिनिधी:  शेतीसाठी वाया जाणाऱ्या पाण्यामध्ये बचत व्हावी व शेतकऱ्यांना दररोज पाणी मिळावे व त्यातून शेतीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ व्हावी, या हेतूने सुरवड (ता. इंदापूर ) येथील भैरवनाथ पाणीपुरवठा संस्थेकडून बंद पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. अशाप्रकारे बंद पाईपलाईनद्वारे शेतीला पाणीपुरवठा करणारी ही राज्यातील एकमेव सहकारी पाणीपुरवठा संस्था ठरली आहे.
                सर्व शेतकऱ्यांना समान पाणी मिळावे या कल्पनेतून संस्थेने २०२० पासून पाट  पद्धत बंद करून बंद पाईपलाईनद्वारे पाणी हे शेतकऱ्यांच्या विहीरीमध्ये प्रति एकरा प्रमाणे समप्रमाणात देण्याचा पाणीवाटप प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना रोजचे रोज पाणी मिळू लागल्याने शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले आहे. संस्थेचे ५०० शेतकरी सभासद असून १२०० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पाणी बचत करून शेती कशी करावी याचा आदर्श मॉडेल ठरणारा हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष केशव सुर्वे व उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी दिली. बंद पाईपलाईनचा खर्च संस्था करीत असून नंतर तो शेतकऱ्यांकडून वसूल केला जात आहे. पुढील वर्षीपर्यंत संस्थेच्या १०० टक्के शेतकऱ्यांना बंद पाइपलाइनमधून पाणी देण्याचे नियोजन पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
    गेली ३१ वर्ष संस्था शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करीत आहे, त्यासाठी शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वंय:अर्थसाहाय्याने ही संस्था सुरू आहे. परंतु आता राज्यातील  पाणीपुरवठा संस्थांना शासनाने वीज दरात सवलत देण्याची  गरज आहे. यापुर्वी संस्थांना वीज दर हा रु.१.१६ प्रति युनिट होता. परंतु जून २०२१ पासून रु. ३.६९ पैसे प्रति युनिट प्रमाणे वीज दर करण्यात आला आहे व इतर करातही वाढ करण्यात आली असून सदरची वाढ सुमारे ३२५% झाली आहे. या वाढीव दराने वीजबिल अदा करणे पाणीपुरवठा संस्थाना अशक्य झाले आहे, पर्यायाने शेतकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या पाणीपुरवठा संस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे. तरी शासनाने वीजेची वाढीव दरवाढ रद्द करावी तसेच पाणीपुरवठा संस्थांना नैसर्गिक नदी स्रोतातून शाश्वत पाणी उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष केशव सुर्वे व उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी केली.
       दरम्यान, संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण रविवारी (दि.१२) श्रीकृष्ण मंगल कार्यालय सुरवड येथे रामदास कोरटकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाचे नियम पाळून पार पडली. प्रास्ताविक उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी केले. 
यावेळी अध्यक्ष केशव सुर्वे, सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, तानाजीराव नाईक, साहेबराव घोगरे, लक्ष्मण कोरटकर, ज्ञानदेव शेरकर, बाळासाहेब घोगरे, तात्यासाहेब खोपकर, शरद कोरटकर, रमेश कोरटकर, हेमंत कांबळे, विरकर, शिवाजी नलवडे, शिवाजी घोगरे, सचिव  सिध्देश्वर घोगरे, शेतकरी उपस्थित होते. आभार संचालक सूर्यकांत फडतरे यांनी मानले.
close