shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवे नाईक ग्रामपंचायत विरोधी पक्षनेते गटाकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांना विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी दिले निवेदन...!



शिंगवे । 


जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांनी शिंगवे येथील जिल्हा परिषद शाळेला संरक्षण भिंत बांधणे कामी व राममवाडी येथे पिण्याचे पाईपलाईन व पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेसाठी पंचायत समितीचे माजी सदस्या अश्विनीताई जाधव व माजी सरपंच विश्वासराव जाधव तसेच शिंगवे नाईक ग्रामपंचायतचे विरोधी पक्षनेते तथा विद्यमान सदस्य अमोल डोळस, महेंद्र कोळपकर, मंगल ताई निकम, सामाजिक कार्यकर्ते हरिश शेळके व समस्त ग्रामस्थ यांच्या सही निशी निवेदन देण्यात आले,  लवकरात लवकर निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन उपाध्यक्ष पाटील यांनी दिले .यावेळी  महाविकास आघाडीचे विविध मान्यवर उपस्थित होते...
close