शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१
श्रीरामपूर : परिसरातील अशोकनगर गावातून करण अनिल मापारी व सचिन बाळू धुमाळ या दोघांच्या घरासमोरून दोन पल्सर गाड्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.त्यामध्ये धुमाळ यांच्या काळ्या रंगाच्या पल्सर चा क्रमांक -एम एच 17 सीक्यू 3058 तर मापारी यांच्या लाल-काळ्या रंगाच्या पल्सरचा क्रमांक -एम एच 17 सी एच 5779 असा आहे.तर तिसरी गाडी श्रीरामपूर शहरातील नेवासारोड वरील आयसीआयसीआय बँकेच्या समोरून चोरीला गेली आहे.ही मोटारसायकल मलायराज थेवल,राहणार- मोरगे वस्ती,श्रीरामपूर यांची असल्याचे समजते.
या दुचाकी चोरी प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार परदेशी व हवालदार वाकचौरे हे यातील आरोपीचा व मोटरसायकलचा शोध घेत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

