श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - संगमनेर तालुक्यातील धडाडीचे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते तथा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक /प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांना ह.भ.प.श्यामसुंदरजी महाराज सोन्नर (आळंदीकर) यांच्या हस्ते दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी पुणे येथे "राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.पुण्यात मोठ्या दिमाखात हा सन्मान सोहळा संपन्न झाला.
या सन्मान सोहळ्यात मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) या संस्थेच्या २१ व्या वर्षातील गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीच्यावतीने शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष,शिवश्री.राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड हे होते. तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रसाळ, महापरिषद समन्वयक प्रकाश सावंत,शिवप्रतिष्ठाणचे रायगड जिल्हा संघटक डॉ.अशोक कुदनर,अहमदनगर जिल्हा संघटक अभय ढेंबरे पा.,संगमनेर तालुका संघटक शिवनाथ नाईकवाडी,राजेंद्र बाजीराव ढेंबरे, सौ.प्रिया राहुल ढेंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम शिवश्री राहुल ढेंबरे पाटील करत आहेत.
गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्यात यावे व गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सह्यांची मोहीम, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी-कष्टकऱ्यांचे झालेले नुकसान, विजेसंदर्भातील नविन विज कनेक्शन,सौर कृषी पंप योजना, ट्रांसफार्मर संदर्भातील अडीअडचणी शासन दरबारी मांडण्याचे कामे यासोबतच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमीत्त शिवप्रतिष्ठानच्यावतीने भव्य बालसंस्कार शिबिराचे आयोजन देखील दरवर्षी केले जाते.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक/दळणवळण विषयक प्रश्नां संदर्भात शासनाकडे पाठपुरावा, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिबीराचे आयोजन, ग्रामीण भागातील पाणी,रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमी अग्रेसर भूमिका. जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेण्याचे काम, कोविड महामारीतही रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना खारीचा वाटा म्हणून मदतीचा हात देण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान आरोग्य राज्यमंत्री ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी देखील शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे,ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील हा युवातरुण सामाजिक शिवकार्य, शांत-संयमी, सामाजिक प्रश्नांची जाण असल्यामुळे शिवक्श्री राहुल ढेंबरे पाटील थोरामोठ्यांच्या गळ्यातील ताईत बनले असुन तरूण पिढीसाठी एक आदर्श असेच त्यांचे कार्य आहे.
शिवश्री राहुल बाजीराव पा. ढेंबरे यांना "राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१" ने गौरविण्यात आल्यानंतर विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी समाजमाध्यमांतुन त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.
शिवश्री राहुल ढेंबरे पाटील यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की,आई-बाबा, कुटुंबातील सदस्य, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेतील माझ्या बंधु भगिनींचा,वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना हा सन्मान समर्पित करतो,सोबतच
आतापर्यंत केलेल्या सामाजिक शिवकार्याची पावती मिळाली.
यामुळे प्रेरणा आणि सामाजिक शिवकार्यासाठी आणखी बळ मिळाले."राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार २०२१" पुरस्काराने सन्मानीत करणाऱ्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) चे ऋण व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

