shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर येथील भर वस्तीत दबा धरून बसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अखेर वैदू समाज सरसावला..!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :- श्रीरामपूर येथे 
काही दिवसांपासून धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद केले.
 
भरवस्तीत बिबट्याचा वावर असल्याने श्रीरामपूरकर पुरते धास्तावले होते. वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गोंधवणी येथील  शिकार करणाऱ्या वैदू समाज बांधवांनी यावेळी महत्त्वाचा सहभाग देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी शहरवस्तीत आलेल्या बिबट्याने रूद्रावतार धारण केले होते.अशा परिस्थितीत बिबट्या जेरबंद करण्यासाठीचे काम फार जिकीरीचे झाले होते.परंतू
जीवाची बाजी लावत गोंधवणी येथील शिकारी चंदर मारुती शिंदे, राजू अशोक शिंदे, अनिल शिंदे, दादासाहेब बनकर, राकेश शिंदे, रामदास शिंदे, लखन शिंदे, लक्ष्मण शिंदे, सुरेश शिंदे, अजय शिंदे, रोहित शिंदे संजय शिंदे रामनाथ शिंदे दीपक शिंदे, अशोक शिंदे, ताया शिंदे, राहुल शिंदे, अमोल शिंदे, आकाश शिंदे, देविदास शिंदे, मल्लू शिंदे, यांनी मोलाची साथ दिली.बिबट्याचा शोध घेत असताना यावेळी चंदर शिंदे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. त्यामुळे चंदर शिंदे यांच्या हाताला व पाठीला  बिबट्याने चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले.त्यांचेवर थत्ते ग्राउंड शेजारील शिंदे हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

ते स्वतः शिकारी असल्या कारणाने त्यांनी त्यांचा जीव थोडक्यात वाचवला. सदरची  माहिती मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली आहे.
close