बिडकिन । प्रतिनिधी :-
बिडकिन येथे सावत्र मुलाने आपल्या आईला धनसंपत्ती आठी घराबाहेर काढल्यामुळे बिडकिन पोलीस स्टेशनमध्ये सावत्र मुलाविरोध्द व अन्य व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली.
या बाबत अधिक माहिती अशी की
दि.३०/डिसेंबर बिडकिनला( तालुका पैठण) तथागतनगर गेली 60 ते 70 वर्षापासून रहिवाशी आसलेले मयत भानुदास बर्फे यांना दोन कुटुंब होते पहिल्या कुटुंबा मध्ये दोन मुले आणि एक मुलगी आणि दुसऱ्या कुटुंबा पासून तीन मुली आणि एक मुलगा असून सगळे विवाहित आहे हयात असताना भानुदास बर्फे यांनी सर्वांना संपत्तीची समान वाटणी करून दिली होती.
परंतु एक वर्षा पूर्वी भानुदास बर्फे मरण पावले आहे त्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजे रमेश बर्फे याच त्याच्या आईच्या संपत्तीवर डोळा होता म्हणून त्यांच्या सावत्र आईचा मानसिक छळ चालू केला दि.30/डिसेंबर रोजी अचानक सदरील आरोपी रमेश बर्फे व मीराबाई बर्फे व त्यांचे मुले मिलिंद बर्फे व किरण बर्फे व सविता बर्फे व रुपाली बर्फे,अनिता शांतीलाल हिवराळे, निता सतीश भालेराव यांनी सगळ्यांनी मिळून बेकायदेशीर पणे संगनमत करुन हातामध्ये लाठ्या काठ्या घेऊन घरावर अचानक हल्ला केला 65 वर्ष ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्त्या यांच्या हाताला पकडुन घराच्या बाहेर काढले व धक्काबुक्की व परिवाराला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिल.
सदरील सर्व कुटुंब भयभीत झाले असुन दहशतीच्या सावट खाली वागत आहे सदरील घटणेची माहीत बिडकिन पोलीसांना दिल्यावर त्या सावत्र मुलावर आणि त्याच्या अन्य नातेवाईकावर पोलीसांनीकारवाई केली आहे.

