शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१
छत्रपती शिवरायांच्या पुतळा विटंबना प्रकरणी मराठा एकीकरण कडून निषेध..!!
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबनेचा मराठा एकीकरण समितीकडुन राहुरीचे तहसीलदार शेख यांना निवेदन देत निषेध व्यक्त करताना देवेंद्र लांबे, अनिल इंगळे, राजेंद्र लबडे आदींसह सदस्य...
राहुरी : आज दि.२० डिसेंबर रोजी राहुरी तहसिल येथे मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी एकत्र येत कर्नाटक राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या माथेफिरुवर कारवाई करण्यात यावी व कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे.
या प्रसंगी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, राजेंद्र लबडे, विजय गव्हाणे, ॲड. गोविंद तनपुरे, ॲड. निलेश धुमाळ, ॲड.प्रमोद घोलप, अनिल इंगळे, बंडू शेठ म्हसे, संतोष भूजाडी, अशोक तुपे, ऋषिकेश येवले, प्रदीप भोर, सचिन करपे, रोहन भूजाडी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व विटंबना करणाऱ्या माथेफिरू विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता.
यावेळी मराठा एकीकारणचे देवेंद्र लांबे म्हणाले की, कर्नाटक मध्ये झालेल्या घटनेचा आम्ही संविधानिक पद्धतीने निषेध नोंदविलेला आहे. देशाचे मा.प्रधानमंत्री यांना तहसिल कार्यालयाद्वारे कर्नाटक राज्याचे मुख्यामंत्री व विकृत मनोवृत्ती असणाऱ्या माथेफिरुवर तात्काळ कारवाई करून कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली आहे. आज छत्रपतींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होत असेल आणि यांना कठोर शासन न झाल्यास याचे तिव्र प्रतिसाद सर्वत्र दिसल्या शिवाय राहणार नाही.
निवेदनात म्हंटले आहे की, अखंड हिंदुस्थानचे तसेच संपूर्ण महाराष्ट्रराज्याचे प्रेरणास्थान, मराठा समाजाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील सदाशिव नगरातील अश्वारुढ पुतळ्यावर निच प्रवृत्ती असलेल्या समाजकंटकांनी गुरुवार दि.१६ च्या रात्री अंधाराचा फायदा घेत विटंबना केली होती, आणि दुसऱ्याच दिवशी त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे.
त्यात कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री असलेल्या बसवराज बोम्मई यांचे वक्तव्य की "पुतळ्याची विटंबना ही शुल्लक बाब आहे" असे खालच्या पातळीवरचे विधान करून महाराष्ट्रातील मराठा छत्रपती शिवशंभु प्रेमींच्या तसेच मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी त्या हिन तसेच निच प्रवृत्ती असलेल्या समाजकंटकांना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तहसीलदार शेख यांचा माध्यमातून निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी सागर ताकटे, सुभाष पवार, रवींद्र कदम, सचिन घाडगे, राहुल चोथे, धनंजय नरवडे, अमोल थोरात, दिलीप घुमे, जनार्धन तारडे, सुभाष जुंदरे, संदीप खांडवे, रमेश सोनवणे, ओंकार भूजाडी, अविनाश क्षिरसागर, शैलेश डोंगरे, विनोद मुसमाडे, अनिल नालकर, मधुकर घाडगे, डॉ. चेतन शेळके आदींसह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

