शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१
राहुरी : महावितरणाच्या सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात प्रहार संघटनेच्या वतीने रास्तोरोको आंदोलनाचा इशारा देताच तोडगा काढण्यासाठी राहुरीचे तहसिलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने महावितरणाचे अधिकारी व आंदोलकांची बैठक घेवून तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवली होती. नायब तहसिलदार पुनम दंडीले,महावितरन अधिकारी निरजकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्यासमावेत सुमारे दोन तास झालेली बैठक अखेर निष्फळ ठरली आहे.त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गुरुवार दि.२ डिसेंबर रोजी नगर मनमाड रोड मार्केट कमिटी समोर ठीक ११ वाजता रास्ता रोको आंदोलन होणारच असल्याचा इशारा प्रहार जन शक्ती पक्षाचे नेते सुरेश लांबे यांनी दिला आहे.
मंगळवार दि. ३० नोहेंबर रोजी दुपारी राहुरी तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार पुनम दंडीले, महावितरणाचे अभियंता धीरज गायकवाड,पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे,साहय्यक अभियंता योगेश गावले, महावितरणाचे हिशोबनिस नागेश कुसमुडे,प्रहारचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबेसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत लांबे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती वाईट आहे. महावितरणाने विज पुरवठा खंडीत करुन सक्तीची वसुली थांबवावी मे महिण्या पर्यंत शेतकऱ्यांकडे पैसे उपलब्ध होणार नाही. महावितरणाने विज बिल वसुल करण्यासाठी आमची हरकत नाही. परंतू रोहिञ बंद करुन वसुली करणे म्हणजे हुकुमशाहीचा प्रकार आहे. त्यामुळे विज पुरवठा खंडीत न करता विज बील वसुली चालू ठेवावी असे बैठकीत लांबे यांनी सांगितले. असता महावितरणाचे अभियंता धीरज गायकवाड यांनी बैठकीत सांगितले की, गेल्या १४ महिन्या पासुन थकबाकी भरण्यासाठी वेळ दिला आहे. आम्हाला वरिष्ठांचे वसुलीसाठी आदेश आहेत. आम्ही ट्रान्सफॉर्मर बंद करूनच वसूली करणार . आमच्याकडे कोळश्यासाठी पैसा नाही त्यावर लांबे यांनी अधिकाऱ्यांना अश्या प्रकारची सक्तीची वीजबिल वसूली आम्ही करू देणार नाही.
सदर बैठकीला विष्णू ढवळे, बापुसाहेब तमनर,रंगनाथ पवार,जगन्नाथ गायकवाड,नितिन पवार,प्रकाश हरिश्चंद्रे,सोमनाथ जवरे,रविद्र म्हसे,अनिल तागड,सुरेश धोंडे,सागर धोंडे,विशाल धोंडे,गणेश दुधाडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

