बाबासाहेब ..
सर्व गुण संपन्न तू
सकलक्षेत्री व्याप्ती
सार्थ बौद्ध धर्मीय
तथागताची रे शक्ती
जाळले मनूस्मृतीला
अंधत्व श्रध्दा मुक्ती
हाडाचे शिक्षक जरी
अखंडित ज्ञानप्राप्ती
भाकरी परी पुस्तका
अजब तुमची भक्ती
अर्थशास्त्रीय गणिती
सार्थ ठरवली उक्ती
महिला सबलीकरण
हवीयं कायदा सक्ती
बळीराजा सुखी हवा
आता कळे आसक्ती
आपणासम राजकर्ते
सदैव बसवावे तख्ती
कितीकाय केले कार्य
प्रिय कामगारां प्रति
आंदोलना दिशा देती
जनसेवा उसळे रक्ती
संविधान खास ठेवा
दिला अतुल्य संपत्ती
आठवते तुझी मुर्ती
कधीही येता आपत्ती
दुजे कुणी ना जगती
बाबा रमाबाई दंपत्ती
2)
महापरिनिर्वाण दिना ..
चैत्य भूमी दे चेतना
समाधान मिळे मना
स्पर्श करता आदरे
उचंबळून ये भावना
पाहिले नाही बाबांना
तरी जागृत संवेदना
मज सम निर्धनाला
मिळे अमूल्यखजिना
अर्थ पूर्ण त्या योजना
दिधलेसं सकल जना
सर्व व्यापी कार्य तुझे
अष्ट पैलुत्व संकल्पना
जाणता रे संविधाना
अर्थ निरर्थक जीवना
माती ती भारावलेली
लाजवीते गा चंदना
उन्मत माते कोरोना
पाहुणाजाता जाईना
खंड पडणारं यंदास
चैत्य भूमीच्या दर्शना
शब्दात काही मावेना
होती असंख्य वेदना
घरातूनचं अभिवादन
महापरिनिर्वाण दिना
3)
भीम किर्ती ..
कधी तरी जन्मा येई
भिमराव त्याग मूर्ती
असा न होणे दुसरा
दिगंतरा जाय किर्ती
डाॅक्टर जादुई दिवा
झळाळे माई ज्योती
आगळे वेगळे दंपती
सकला देती स्फुर्ती
शिक्षण समृद्ध माती
पिकवले ज्ञान मोती
निळासूर्य आभाळात
कुर्निसात करे धरती
दिधले महा मानवाने
संविधानआम्हां हाती
अद्रुश्य साथ माईंची
उजळी सहस्त्र वाती
भुकेहूनि श्रेष्ठ पुस्तके
संपत्ती ही थोर किती
घराचे करी ग्रंथालय
दावी शिक्षण महती
पती पत्नी ही नाती
अलौकिक हो जगती
इतिहास जाण ठेवी
त्रिखंडात हो ख्याती
4)
निळ्या सूर्या .. ..
सदोदित येत राहते
बाबासाहेबआठवण
कामगारा दिलेकिती
गच्च भरी साठवण
संघटीत हो कामगार
योग्य वेळी आंदोलन
केलेले उचीत कानून
आम्ही सुखी म्हणून
माल्यार्पण करी तुज
उपकार तव जाणून
लिंग भेद मुळी नको
सकला समान वेतन
बायांना प्रसुती रजा
बदलले तया प्रांक्तन
सेवा योजना संस्थान
उघडले छान दालन
बेकारां देई रोजगार
दिल्या शब्दाचे पालन
औद्योगिक परिषदही
भिमाने केली स्थापन
अन्याय विरोधी लढा
सुरू केल्या युनियन
योग्य मोबदला घामा
तुज मुळे सार्थ सपन
जगतोयं सुखी जीवन
रोजगार मिळे साधन
महा मानवा धन्यवाद
तुज करी अभिवादन
- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996
www.kavyakusum.com

