शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत कुक्कुटपालन प्रशिक्षण संपन्न..!!
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठात भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत परसबागेतील कुक्कुटपालन प्रशिक्षणाचे आयोजन राहुरी तालुक्यातील कानडगाव, तांभेरे व कणगर या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभागातील प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र निमसे यांनी परस बागेतील कुक्कुटपालन, कोंबड्यांचे व्यवस्थापन व आजार या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे यांनी केले. तांभेरे येथील प्रगतशील शेतकरी ताराचंद गागरे यांनी आभार मानले. सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तांभेरे, कानडगाव, चिंचविहिरे व कणगर या गावातील 100 पेक्षा जास्त शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकल्पाचे प्रक्षेत्र सहाय्यक राहुल कोर्हाळे यांनी सहकार्य केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

