shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्राईम; अहमदनगर येथे 'जेल पोलिस पदा'च्या लेखी परीक्षा केंद्रात गैरप्रकार ; दोघांवर गुन्हा दाखल..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१ 

अहमदनगर येथे ‘जेल पोलिस पदा’च्या लेखी परीक्षा केंद्रात गैरप्रकार ; दोघांवर गुन्हा दाखल


अहमदनगर :  अभ्यासातील आळशीपणाचा कळस शनिवारी (दि.११) जेल पोलिस पदासाठी अहमदनगर येथे झालेल्या लेखी परीक्षेमध्ये पाहण्यास मिळाला. एका परीक्षा बहाद्दराने मोबाईलच्या सहाय्याने कॉफी केली तर दुस-या बहाद्दराने कळसच गाठला, त्याने परीक्षेलाच डमी उमेदवार बसविल्याचे उघड झाले. या दोन्ही बहाद्दरांवर  तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबाद जेल पोलिस या पदासाठी शनिवारी (दि.11) रोजी परीक्षा घेण्यात आल्या.  या दरम्यान  अहमदनगर शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करताना दोघांना पोलिस व पर्यवेक्षकांच्या सावधगिरीमुळे पकडण्यात आले.
सिद्धीबागेनजिक असणा-या दादासाहेब रुपवते विद्यालय परीक्षा केंद्रावर गणेश सुरेश भवर (रा. टाकळी कदीम, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) याने तोतया (डमी) उमेदवार म्हणून आरोपी निलेश कमल सुंदरदंडे याला परीक्षेत बसविल्याचे निर्दशनास आले. तर  विद्यालयाच्या प्रवेशद्वारामध्येच परीक्षा ओळखपत्र तपासणीत संशय आला. यावेळी आरोपी निलेश सुंदरदंडे हा पळून गेला. परीक्षा समन्वयकांनी वास्तव उमेदवार गणेश भवर याला पकडले. या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना रेसिडेन्शिअल विद्यालयामध्ये समोर  आली. विकास परमसिंग बारवाल (रा. नांदी, ता. आंबड, जि. जालना) या बहाद्दराने चप्पलमध्ये मोबाईल हॅण्डसेट आणला होता. कानामध्ये मायक्रो स्पीकर लपवला होता. त्याच्या बॅगेमध्ये एका डिव्हाईस होता. त्या डिव्हाईसच्या माध्यमातून तो  ऐकता होता. त्याने त्या मोबाईलवरून प्रश्‍नपत्रिकेचा फोटो काढला. तो फोटो एका व्हाटसअप ग्रुपमध्ये पाठविला.  त्या ग्रुपमध्ये अन्य दोन जणांचा समावेश  होता. तो मोबाईलवरून फोटो पाठवित असल्याचे पर्यवेक्षिका वर्षा विजयकुमार परदेशी यांच्या निर्दशनास आले. त्यांनी ही माहिती परीक्षा समन्वयक कैलास गोरे यांना दिली. यानंतर पंचासमक्ष त्याची तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळील मोबाईल हॅण्डसेट, डिव्हाईस, मायक्रो स्पीकर जप्त करण्यात आले.

शहर विभागाचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. या दाखल गुन्ह्याचा तोफखाना पोलीस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी या तपास करीत आहेत.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close