shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाला एक वेगळे वळण..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक १४ डिसेंबर २०२१ 

अहमदनगर :  शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाला एक वेगळे वळण देण्यात येत आहे. उड्डाणपुलासाठी आणखी १२ पिलर तयार करण्यात येत आहेत. अहमदनगर शहरातील सक्कर चाैक ते स्टेट बँक चाैकाच्या पुढे पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व पिलर उभ्या राहिल्या आहेत. पिलरवर कॅप देखील चढविण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता सेगमेंट बसविण्याचे काम सुरू आहे. ते देखील निम्मे झाले आहे. त्यातच अहमदनगर महाविद्यालय आणि सीएसआरडीच्या बाजूने आणखी १२ पिलर उभ्या केल्या जात आहेत. हे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
🛣️ साेलापूरकडे जाणारा रॅम्प

या एक्स्ट्रा पिलर का उभारल्या जात आहेत, याची चर्चा सध्या नगरकरांमध्ये आहे. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे. या एक्स्ट्रा पिलरवर एक रॅम्प तयार केला जाणार आहे. साेलापूर मार्गाकडे हा रॅम्प काढून ताे जाेडला आहे. साेलापूरकडून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याकडून साेलापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा रॅम्प असणार आहे. त्यासाठी या पिलर उभारल्या जात असून, लवकरच हे काम पूर्ण हाेणार असल्याची माहिती राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण यांनी दिली. उड्डाणपुलाचे काम पूर्ण हाेताच या रॅम्पचा कसा वापर करायचा ते दर्शवणारा फलक उभारला जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना याेग्य ती माहिती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close