शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०३ डिसेंबर २०२१
राहुरी : शेती पंपाचे रोहित्र बंद करून चालू असलेल्या सक्तीच्या वीज बिल वसूली विरोधात काल २ डिसेंबर रोजी राहुरी येथे चक्काजाम आंदोलन करण्रात आले होते. आंदोलकांनी आत्मदहनाचा ईशारा दिला असताना पोलिसांनी आंदोलन सुरू असतानाच धरपकड सुरू केली. अचानक झालेल्या या कारवाईने कार्यकर्त्यांची पळापळ झाली. पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आंदोलनामध्ये कारवाई होत असताना दोन पोलिस जखमी झाले आहे.
प्रहार संघटना, वंचित बहुजन आघाडी, आरपीआय व इतर संघटनांनी वेळोवेळी निवेदने व आंदोलने केली. शेतकर्यांच्या शेती पंपाची सक्तीची विज बील वसुली चालू आहे. शेतकर्यांचा जीवन मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना महाराष्ट्र शासन शेतकर्यांकडून सक्तीची वीजबिल वसुली करून अन्याय करत आहे. वीज बील वसुलीच्या माध्यमातून लूट केली जात असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले होते. प्रहार संघटनेसह वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव, पिंटूनाना साळवे, आरपीआयचे विलास साळवे, बाळासाहेब जाधव, एकलव्य संघटनेचे नामदेव पवार यांसह अनेकांनी आंदोलनाला पाठींबा दिला होता. वीज बील वसुलीचे तात्काळ आदेश महावितरणच्या अधिकाऱ्यांना द्यावे. शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बील माफ करावे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान द्यावे. अशी मागणी करीत आंदोलकांनी राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यास प्रारंभ केला. राहुरी बाजार समिती समोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्ष तसेच इतर सामाजिक संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुकाध्यक्ष सुरेश लांबे, पप्पूशेठ रेवले, नितीन पानसरे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे, आरपीआरचे बाळासाहेब जाधव, तालुकाध्यक्ष विलास साळवे, लहानु तमनर, नामदेव पवार आदींना आंदोलन सुरू असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे रांनी फौजफाट्यासह ताब्यात घेतले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव व मधुकर शिंदे यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान अचानक झालेल्या कारवाईने या ठिकाणी काही काळ तणाव पूर्ण वातावरण निर्माण झाले. आंदोलक व पोलिसांमध्ये चांगलीच वादावादी होत असतानाच पोलिसांनी खाक्या दाखवित आंदोलकांना ताब्यात घेतले.
घटनेमध्ये आंदोलकांनी शासकीय वाहनाचे नुकसान केल्यानंतर पोलिसांवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये पोलिस हवालदार रामचंद्र कोळगे व आजिनाथ पाखरे हे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यानुसार प्रहार संघटनेचे सुरेश लांबे, जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, पप्पूसेठ येवले, नितीन पानसरे, बाळ तमनर या पाच जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

