shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भाजप आमदार मोनिका राजळे आणि कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी केली अटक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०१ डिसेंबर २०२१

शेवगाव :  महावितरण च्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या आ. मोनिकाताई राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.
 
         कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकात सोमवारी सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत सुरूच होते. प्रशासनानेही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

अटक केलेल्यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, शहराध्यक्ष रवी सुरोसे, गंगा खेडकर, नितीन दहिवाळकर, नगरसेवक महेश फलके, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे आदींचा समावेश आहे.
 
आंदोलकांना अटक करून पोलिसांनी बळजबरीने पोलिस गाडीमध्ये बसवून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आल्यानंतरही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलिस ठाण्याच्या दारातच ठिय्या दिला.रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close