shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फोटो काढून साई भक्तांच्या भावना दुखावल्या जातात..!!



शिर्डी । (प्रतिनिधी):-
 शिर्डी येथे श्री साई मंदिरात श्री साईबाबा समाधी समोर किंवा साई द्वारकमाई व इतर मंदिरात फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र मंदिर किंवा संस्थान परिसराच्या बाहेर अनेक फोटोग्राफर फिरत असतात. व ते संगणकावर ऑडिट करून साई समाधी समोर दर्शन करतानाचे साई भक्तांचे बनावट फोटो अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन काढून देत असतात. त्यामुळे साईभक्तांचा विश्वास घात होतो व श्रद्धेला तडा जात आहे. तरी हा प्रकार त्वरित बंद व्हावा. अशी मागणी शिर्डीतील बायजा मा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कोते यांनी केली आहे

         यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तीर्थस्थान असून श्री साई मंदिर व परिसरात साई संस्थानने कोणालाही साई भक्तांना मोबाईल कॅमेरा आत नेण्यास मनाई आहे. त्यामुळे श्री साई मंदिरात किंवा मंदिराच्या आसपास समाधीसमोर द्वारकामाईत व विविध साई मंदिर परिसरात फोटो काढण्यास मनाई आहे. मात्र असे असताना संस्थान परिसराच्या बाहेर अनेक फोटोग्राफर कॅमेरा घेऊन फिरत असतात व साई भक्तांना आपण साई समाधीसमोर दर्शन करताना उभे आहोत. असे ऑडिट करून फोटो काढुन देतो .असे म्हणून साईभक्तांना आकर्षित करतात. साई भक्तांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांचे फोटो काढत ते संगणकावर ऑडिट करत साई बाबांच्या समोर दर्शन करताना किंवा समाधी मंदिरात जवळच साई भक्तांना उभे असतांना   असे विविध प्रकारचे पोज असलेले फोटो या संगणकावर ऑडिट करून हे फोटोग्राफर साईभक्तांना देत असतात. मात्र त्यामुळे साईभक्त आपल्या घरी गावी शहरी गेल्यानंतर तेथे मात्र वेगळा मेसेज जातो. कारण मंदिरात फोटो काढण्यास मनाई असताना हे फोटो काढले कसे जातात. अशी चर्चा होते.सर्वजण संभ्रमात त्यामुळे पडतात .एक प्रकारे साईभक्तांना फसवण्याचाच हा प्रकार आहे. तरी हा प्रकार बंद व्हावा.  एडिट करून फोटो देणारे
  फोटोग्राफर ,सपोटर ,या सर्वांवर नियंत्रण यावे.यासाठी यापूर्वी प्रयत्न झाले होते. मात्र फक्त आश्वासन मिळाले. कारवाई झाली नाही व आजही असे अनेक फोटोग्राफर मंदिराच्या बाहेर साई भक्तांच्या गर्दीत फिरत असतात व अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन त्यांचे फोटो काढत साई समाधी शेजारी संगणकावर एडिट करून दाखवले जाते .हे इथून पुढे तरी बंद व्हावे.



यासाठी शिर्डी पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिर्डी पोलीस स्टेशनला नव्यानेच  सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सुरेश माने आले आहेत .नक्कीच कर्तव्यदक्ष व धडाडीचे अधिकारी असल्याने ते तरी या गोष्टीकडे लक्ष देतील अशी आशा साईभक्तांना आहे. अन्यथा जर अशा फोटोग्राफरवर कारवाई करण्यात आली नाही व साईभक्तांचा विश्वासघात करण्यात येत असेल, श्रद्धेला तडा दिला जात असेल तर या साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या  फोटोग्राफंर तरुणांचा बंदोबस्त ग्रामस्थ करतील व त्या संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आली तर आंदोलन करू असा इशारा शिर्डीतील बायजा मां प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव कोते यांनी दिला आहे.
close