सर्व स्तरातून होत आहे कौतुक अभिनंदन
प्रतिनिधी : आसावरी वायकर
पंढरपुर : ४ / जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्यावतीने आयोजित विभागीय स्तरावरील खेलो इंडिया खो - खो स्पर्धेचे आयोजन न्यू सोलापूर खो - खो क्लब सोलापूरच्या सहकार्याने २ डिसेंबर गुरुवार रोजी
शासकीय क्रीडांगण नेहरूनगर सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली ता. पंढरपूर या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांतील १८ वर्षेखालील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल व त्याची बालेवाडी - पुणे येथे होणाऱ्या १४ ते १६ डिसेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या .
श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व सहकार शिरोमणी वसंंतराव काळे स.सा. का.लि. चंद्रभागानगर-भाळवणी चे चेअरमन मा. कल्याणरावजी काळे साहेब , संस्थेच्या संचालिका व K K SPORT'S च्या मार्गदर्शिका मा.सौ. संगिताताई काळे वहिनीसाहेब , सचिव मा. बाळासाहेब काळे गुरूजी , डाॕ. अजित काळे , प्राचार्य मा. दादासाहेब खरात सर , पर्यवेक्षक मा. सत्यवान काळे सर , सिनियर लिपीक मा. नानासाहेब काळे सर , मा. दशरथ काळे सर , मा. गौतम लामकाने सर , मा. शिवाजी कौलगे सर , अजित बनकर सर वेळापूर , मा. शंकर बागल सर , मा. सौदागर सुरवसे , मा. कल्याण काळे , मा. अशोक काळे , मा. संंतोष सुरवसे सर यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
किसन कांबळे सर करमाळा तालुका अध्यक्ष मागास वर्ग शिक्षक संघटना यांनीही अभिनंदन केले .
या खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडूं , राज्यक्रीडा मार्गदर्शक मा. सत्येन जाधव साहेब , क्रीडाशिक्षक प्रा. संतोष पाटील सर , प्रशिक्षक अतुल जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.

