स्मायली फाउंडेशन व वडमाऊली विकास मंचचे मानले आभार..!!
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधी:-
जनतेच्या सेवेसाठी अडीअडचणीच्या काळात जनतेला आधार देण्यासाठी स्मायली फाउंडेशन व वडमाऊली विकास मंच कायम आग्रेसर असतो.कोरोना सारख्या मारामारीत देखिल स्मायली फाउंडेशन व वडमाऊली विकास मंचने केलेले कार्य कौतुकास्पद आसल्याचे प्रतिपादन विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांनी विडा प्रा.आरोग्य केंद्राला ४ लक्ष रूपयांच्या ऑक्सिजन मशिन वितरणा प्रसंगी केले.
केज तालुक्यातील विडा प्रा.आरोग्य केंद्राला गेल्या कित्येक वर्षांपासून ऑक्सिजन मशिन उपलब्ध नसल्याने कर्मचार्यांना मोठ्या आडचणींचा सामना करावा लागत होता.त्यातच महाराष्ट्रभर जनतेच्या सेवेसाठी उत्कृष्ट काम करत आसलेले स्मायली फाउंडेशन व वडमाऊली विकास मंचच्या पुढाकारातून ४ लक्ष रूपये किंमतीच्या पाच ऑक्सिजन मशिन बुधवारी दु.१२ वा. विडा गटाचे लोकप्रिय जि.प.सदस्य विजयकांत मुंडे यांच्या शुभहस्ते विडा प्रा.आरोग्य केंद्राकडे सुपूर्द करण्यात आल्या प्रसंगी स्मायली फाउंडेशन व वडमाऊली विकास मंचचे सचिव भास्कर मुंडे,विडा प्रा.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शिला कांबळे,विड्याचे सरपंच सुरज पटाईत,जेष्ठ नेते अशोक वाघमारे,ग्रा.पं.सदस्य अंकुश कलाणे,डाॅ.धनराज पवार,जनविकास संस्थेचे उत्तम गायकवाड,चंद्रकांत कुलकर्णी,बाबासाहेब मुळे,बालप्रसाद भुतडा,तुळशीराम तोंडे,बप्पा बर्दापूरकर,प्रसाद पटाईत,सुंदर जाधव,डाॅ.आंधळे साहेब यांच्यासह ग्रामस्थ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

