एरंडगाव :- शासनाच्या शिक्षण विभागात वर्ग-1/ व वर्ग-2 ही पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. शासनाकडून ही पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक वेळा माहिती मागवण्यात आली. 1 जानेवारी 2022 च्या शासन आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील नेट/सेट/ पी.एच.डी. धारक प्राथमिक शिक्षकांना शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्ग-1/ व वर्ग-2 गट शिक्षणाधिकारी,, शिक्षण विस्ताराधिकारी, प्राचार्य कनिष्ठ ,महाविद्यालय या पदावर सामावून घेण्याच्या धोरणात्मक निर्णय झाला असल्याचे कळते. पात्रताधारक शिक्षकांची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाकडून मागवण्यात आली आहे, परंतु या याच बरोबर खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षका प्रति दुजाभाव दाखविण्यात आला आहे.
अशी कुठलीच माहिती माध्यमिक शिक्षक विभागाकडून मागवण्यात आलेली नाही. असे शासनाच्या पत्रावरून दिसते उच्च माध्यमिक शिक्षकांनी आपले अध्यापनाचे नियमित कार्य सांभाळून शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च विद्यावावस्पती उच्च अहर्ता प्राप्त केली आहे. शासनाच्या सापत्न धोरणामुळे यांची पदवी आणि सार्थक ठरून शिक्षकांच्या मनात वैफल्याची भावना निर्माण झाली आहे तसे पाहता उच्च माध्यमिक विद्यालयातील जय शिक्षकांची उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त करून सुद्धा अशा शिक्षकांना पदोन्नतीच्या कुठले संधी नसतात तरीही बऱ्याच शिक्षकांनी कला विज्ञान वाणिज्य व क्रीडा अशा विविध शाखातून "विद्यावाचस्पती" पदवी प्राप्त केली आहे सदर पदावर उच्च माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती केले आहेत त्यांचे शिक्षण क्षेत्रातील ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी व नवीन संकल्पना राबवण्यासाठी होऊ शकतो पूर्वी ही पदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक आतून भरती केली जात होती परंतु आत्ताच उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षका प्रति हा दुजाभाव का ?अशी चर्चा शिक्षण क्षेत्रात होत असून नाराजीचा सूर उमटत आहे शिक्षण विभागातील प्रशासकीय वर्ग-1 व वर्ग-2 या पदावर प्राथमिक सोबत खाजगी शासन मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक पीएच.डी. धारक शिक्षकाची नेमणूक केल्यास महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जेथे शिक्षण विभागात उच्च पीएच.डी.धारक शिक्षकाची नेमणूक केल्यास महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जेथे शिक्षण विभागात उच्च अहर्ताधारक अधिकारी असतील त्यामुळे निकोप व उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था उदयसिंह म्हणून शैक्षणिक व्यवस्थेविषयी तळ मळ असणारे व शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणारे विधान परिषदेतील लोकप्रतिनिधींनी यावर ठोस प्रयत्न करावी अशी आशा चे निवेदन उच्च माध्यमिक विद्यावाचस्पती व संघर्ष समितीकडून मा. पदवीधर आमदार नागो गाणार यांना निवेदन देण्यात आले आहे.
त्यावेळी डॉ सुधीर रायपूरकर , डॉ विजय राठोड , डॉ बादल चव्हाण, डॉ देशमुख, डॉ चुडे, डॉ श्रीखंडे डॉ रमेश खैरे आदी उपस्थित होते.

