shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना कोव्हीड 19 चे लसीकरण आपल्या दारी हा अभिनव उपक्रमात नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद

एरंडगाव । प्रतिनिधी:-
गेल्या दोन ते अडीच वर्षापासून कोरोणा आजाराने घातलेल्या थैमनामुळे कोरोनाच्या तिसरे लाटेचा वाढता प्रादुर्भाव बघून जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले व पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली  समीर शेख यांनी शेवगाव शहरात प्रभाग क्रमांक पाच मध्ये वयोगट 18 ते 44 -180 ,45 ते 59-49, 60वर्षाच्या   पुढील-35 असे एकूण 264 नागरिकांनी कोव्हीशील्ड लसीकरणा लाभ घेतला.

शेवगांव शहरात गेल्या काही दिवसांपासुन सुरु असलेली कोरोना कोव्हीड 19 चे लसीकरण आपल्या दारी हा अभिनव उपक्रम नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद 
 प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगरपरिषद शेवगांव आणि आरोग्य विभाग पंचायत समिती शेवगांव आणि ग्रामीण रुग्णालय शेवगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मदिना हॉल नाईकवाडी मोहल्ला  येथे कोव्हीशील्ड चा  पाहिला आणि दुसरा आणि को-वॅक्सीन चा पाहिला आणि  दुसऱ्या लसीकरणासाठी सुरु झालेला  18 तें 60 या वयोगटासाठीचा  लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र घोटन येथील श्रीमती मरकड शरयू आरोग्य सेविका, शेळके हरीश आरोग्यसेवक, सुनील धावणे आरोग्य सहाय्यक, श्रीमती प्रतिभा सातपुते गटप्रवर्तक,  नगरपरिषद कर्मचारी अरुण तोगे ,संजय सुरवसे,गोपी छजळानी ,हबीब शेख, विशाल डहाळे ,संजय साखरे, अशोक आहेर यांनी सहकार्य  केले तसेच ग्रामीण रुग्णालयाचा मेडिकल स्टाफ यांनी प्रभागात फिरून जनजागृती करून नागरिकांना लसीकरण करण्यास प्रवृत्त केले असाच लसीकरणाचा कार्यक्रम संपुर्ण शेवगांव शहरात वेग वेगळ्या प्रभागात राबवणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

लसीकरण व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी समीर शेख यांनी  परिश्रम घेतले. यावेळी हाजी युसुफ शेख ,हाजी फारुकभाई, हाजी फिरोज पठाण ,नगरसेवक उमर शेख,आयुब पठाण , समिर फकिरमोहमद शेख, अलीम शेख  साजिद सय्यद, असलम शेख ,नवाज सय्यद ,गुड्डू काझी, मोबीन तांबोळी, तन्वीर पठाण ,अजीम तांबोळी ,अनिस सय्यद, जमीर शेख ,आरेज पठाण, सादिक शेख, नवाज शेख ,युनूस शेख, अश्फाक शेख, आबेद सय्यद, नवेद पठाण, उमर पटेल  ,कफील शेख,आकिल शेख आदी उपस्थित होते. 


फोटो प्रवीण खोमणे
close