शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक १७ डिसेंबर २०२२
संगमनेरात कत्तलखान्यांवर छापा 250 किलो मांस जप्त,25 जनावरांची सुटका..!!
संगमनेर : बेकायदेशिररित्या जनावरांची कत्तल करणार्या कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून 37 हजाराचे गोवंश जनावरांचे मांस जप्त केले आहे तर 25 जीवंत जनावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील जमजम कॉलनी परिसरातील गल्ली क्रमांक 9 मध्ये अब्दुल हमीद अहमद कुरैशी याच्या वाड्यात 250 किलो गोवंश जनावरांचे मांस पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मिळून आले. सदर गोमांस जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस शिपाई गणेश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल हमीद अहमद कुरैशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच शहरातील रहेमतनगर जवळील काटवानात गोवंश जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने आणले असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 17 गायी एक लाख रुपये किंमतीच्या, 2 बैल 30 हजार रुपये किमतीचे, 4 वासरे 20 हजार रुपये किमतीचे 2 रेडे 20 हजार रुपये किमतीचे असे एकूण 2 लाख 40 हजार रुपये किमतीचे जनावरांची पोलिसांनी छापा टाकून सुटका केली आहे. सदर जनावरांची रवानगी पांजरपोळ येथे करण्यात आली आहे. तर आरोपी फरार झाला आहे.
याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विवेक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धिंदळे करत आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

