shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

7 जानेवारी पासून राहुरी येथे एस. एस. वाय. सिद्ध, समाधी, योगा, चे वर्ग सुरू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०५ डिसेंबर २०२२


7 जानेवारी पासून राहुरी येथे एस. एस. वाय. सिद्ध, समाधी, योगा, चे वर्ग सुरू..!!


 
राहुरी : आपल्या मनात असलेले स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला प्रेरणा ऊर्जा हवी असते. अनेक वेळा प्रेरणा किंवा ऊर्जा न मिळाल्याने आपले स्वप्नं साकार होत नाही अशा व्यक्तीसाठी एस एस वाय म्हणजेच सिद्ध समाधी योग वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. ह्या सिद्ध समाधी योगाचे अनेक फायदे आहेत. अगदी मानसिक, शारीरिक, भौतिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, स्तरावर देखील खूप फायदे आहेत, ज्यांना जे हवे ते मिळवून देण्याची ताकद या वर्गात आहे. गुरुजी ऋषी प्रभाकर हे एक मोठे शास्त्रज्ञ व उच्चशिक्षित होते.

       त्यांनी जीवनाच्या सर्वांगाचा अभ्यास करून माणसाचे जीवन सोपे करण्यासाठी जे आवश्यक आहे ते इथे दिले जाते. प्रत्यक्ष कृती व परिणामावर आधारित हे परिमाण आहे, चर्चासत्र, आहार, प्राणायाम,ध्यान, खेळ ह्या सर्वाद्वारे व्यक्तीचे शुद्धीकरण केले जाते. त्यामुळे मन व शरीर हलके होऊन व्याधी कमी होतात. त्यामुळे माणसाच्या अंगावर उत्साह संचारतो. सेवा माणुसकी, उदारता याची ओळख होते. मुख्य म्हणजे स्वतःला ओळखता येते, हे केवळ पंधरा दिवसात साध्य होते.

 

     सात जानेवारी पासून हे वर्ग सुरू होत आहेत, इच्छुकांनी त्वरित वैरागर हॉस्पिटल, पाण्याच्या टाकीजवळ, राहुरी येथे नाव नोंदणी करावी. अधिक माहिती साठी डॉ. वैरागर ( 75885 13528), डॉ. वैरागर मॅडम (94227 28476), किंवा प्रा. रोहोकले (9975773211) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close