शिर्डी । प्रतिनिधी
शनिवार 29 जानेवारी रोजी खासदार प्रकाश जावडेकर यांनी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.
देशाचे माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे राज्यसभा खासदार प्रकाश जावडेकर यांनी आज शनिवार 29 जानेवारी रोजी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले.प्रकाश जावडेकर हे आज हेलिकॉप्टरने शिर्डीत आले होते . आमदार राधाकृष्ण विखे यांनी प्रकाश जावडेकर यांचे हेलिपॅडवर उतरताच शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर, शिर्डी शहराध्यक्ष सचिन शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा जिल्हा सचिव सोमराज कावळे आदी उपस्थित होते.
प्रकाश जावडेकर यांनी श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्री साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र पत्रकारांशी यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करण्यास टाळले.
यावेळी काही मोजक्या भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रकाश जावडेकर यांच्या समवेत चर्चा केली.

