shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शाळेला संगणक वितरण..!!

आ. तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील शाळेला संगणक वितरण..!!

राहुरी : तालुक्यातील तांभेरे येथील जि.प. शाळा गागरे वस्ती व बेलकर वस्ती या शाळेत आ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून नामांकित कंपनीचे संगणक संच वितरण करण्यात आले.

संगणक संचाचे वितरण सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तांभेरे मधील सहा शाळेंपैकी दोन शाळेत संगणक प्राप्त झाले आहे, उर्वरित चार शाळेसाठी संगणक मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले. आ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून तांभेरे येथील जिल्हा परिषद शाळांना संगणक संच मिळावे म्हणून वेळोवेळी श्री पवार यांनी पाठपुरावा केला.


यातूनच पहिल्या टप्प्यात या दोन शाळांना संगणक संच प्राप्त झाले आहेत. कोरोना प्रादुर्भाव असल्याने मोजकेच व्यक्तींच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले. या शाळांना संगणक मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आनंद बघण्यास मिळाला आणि त्याचे प्रतीक म्हणून देणाऱ्याचे हात हजार घेणाऱ्याची झोळी फाटकी या उक्तीप्रमाणे या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ यांनी आ. सुधीर तांबे यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

 

या वितरण सोहळ्याप्रसंगी ह.भ. प. विनोद महाराज मुसमाडे, तांभेरे ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर मुसमाडे, डॉ. सुधाकर मुसमाडे, ग्रा.प. सदस्य डॉ. उमेश मुसमाडे, बेलकर वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बेलकर, बेनकर वस्ती शाळेचे शिक्षक वाघ सर, म्ह्स्कूले मॅडम, गागरे वस्ती शाळेचे शिक्षक पठाण सर, नांगरे सर व विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close